राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन
यात्रेतील जाहीर सभा विक्रमगड येथे झाली, या
सभेत बोलताना विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
केली यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, पंतप्रधान
नरेंद्र मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय. मला मोदींची भाषणं ऐकली की गजनी चित्रपटातील
अभिनेता आमिर खानच्या भूमिकेची आठवण येते अशी खरमरीत टीका केली आहे. त्यावेळी
धनंजय मुंडे बोलत होते.
‘नरेंद्र मोदींची २०१४ सालच्या
निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमिर खानची
आठवण येते. मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. अहो, इथे विक्रमगडच्या चौकाचौकातही
मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा होत असेल’, असा
टोला मुंडे यांनी लगावला. ‘मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच २०१४ सालची
भाषणं ऐकवली तर मोदी स्वतःच प्रचारासाठी बाहेर पडणार नाही. २०१४ सालच्या लाटेत
देशाचं, राज्याचं प्रचंड नुकसान झालंय. मात्र
आता यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही’, असंही मुंडे म्हणाले.